योजना · नोंदी तपासल्या: 29-09-2026
अंगणवाडी सेवा (ICDS)
अंगणवाडीत 6 सेवा: पूरक पोषण, पूर्व-प्राथमिक शिक्षण, पोषण व आरोग्य शिक्षण, लसीकरण, आरोग्य तपासणी आणि पुढील उपचारासाठी पाठवणं. लसीकरण, तपासणी व पाठवणं आरोग्य विभागामार्फत (आशा, ANM).
कोणासाठी
- गरोदर महिला व स्तनदा माता
- 6 वर्षांखालील मुलं
- अंगणवाडीत नाव नोंदवलेल्यांनाच पूरक पोषण मिळतं
योजना · नोंदी तपासल्या: 29-09-2026
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (JSSK)
सरकारी आरोग्य संस्थेत गरोदरपण, प्रसूती आणि बाळंतपणानंतर 42 दिवसांपर्यंत आईला, तसंच 1 वर्षापर्यंतच्या आजारी बाळाला मोफत सेवा.
कोणासाठी
- सरकारी आरोग्य संस्थेत येणाऱ्या सर्व गरोदर महिला व बाळंतपणानंतर 42 दिवसांपर्यंतच्या माता
- 1 वर्षापर्यंतची आजारी बाळं: मोफत उपचार, औषधं, तपासण्या व वाहन
- उत्पन्न, जात किंवा कितवं बाळ याची अट नाही
योजना · नोंदी तपासल्या: 29-09-2026
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (UIP)
मुलांना व गरोदर महिलांना सरकारी आरोग्य सेवेत मोफत लसी.
कोणासाठी
- लहान मुलं (वयानुसार वेगवेगळ्या लसी)
- 10 व 16 वर्षांची मुलं (Td लस)
- गरोदर महिला
योजना · नोंदी तपासल्या: 29-09-2026
ॲनिमिया मुक्त भारत अभियान (AMB)
रक्तक्षय (ॲनिमिया) टाळण्यासाठी व उपचारासाठी: लोह व फॉलिक ॲसिड (IFA) गोळ्या किंवा सिरप, तपासणी, उपचार, जंतनाशक आणि लोहयुक्त स्थानिक आहाराची माहिती.
कोणासाठी
- 6 महिने ते 9 वर्षांची मुलं
- 10 ते 19 वर्षांचे किशोरवयीन मुलं-मुली
- गरोदर महिला व स्तनदा माता
- 20 ते 49 वयाच्या महिला
- कमी वजनाने जन्मलेली 0 ते 6 महिन्यांची बाळं
जून 2026 मध्ये नवी मार्गदर्शक तत्त्वं आली (7 लाभार्थी गट, 7 उपाय). तुमच्या भागात काय मिळतं ते आरोग्य केंद्रात विचारा.
योजना · नोंदी तपासल्या: 29-09-2026
पीएम पोषण (प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण)
सरकारी व शासन अनुदानित शाळांमध्ये मुलांना एक गरम शिजवलेलं जेवण.
कोणासाठी
- सरकारी किंवा शासन अनुदानित शाळेतील इयत्ता 1 ते 8 ची मुलं
- या प्राथमिक शाळांमधील बालवाटिका / पूर्व-प्राथमिक वर्गातील मुलं
योजनेचा मंजूर कालावधी 31 मार्च 2026 ला संपला. 30 सप्टें 2026 पर्यंत किंवा नवी मंजुरी मिळेपर्यंत (जे आधी होईल) तात्पुरती मुदतवाढ. पुढची स्थिती शाळेत विचारा.
सध्याची उपलब्धता व नियम संबंधित विभागाकडे तपासा.
योजना · नोंदी तपासल्या: 29-09-2026
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY)
गरोदर व स्तनदा मातांना मजुरी बुडाल्याची भरपाई व पोषणासाठी मदत.
कोणासाठी
- यापैकी एक: कुटुंबाचं उत्पन्न ₹8 लाखांपेक्षा कमी, BPL/NFSA रेशन कार्ड, SC/ST, 40% दिव्यांगत्व, e-Shram, मनरेगा जॉब कार्ड, PM-KISAN महिला शेतकरी, आयुष्मान
- वय 18 वर्षं 7 महिने ते 55
- जन्मानंतर 270 दिवसांपर्यंत नोंदणी
मिशन शक्ती अंतर्गत योजना 2025-26 पर्यंत मंजूर; पुढील कालावधीची खात्री करायची.
सध्याची उपलब्धता व नियम संबंधित विभागाकडे तपासा.